मोठी खळबळ! रात्रीच्या सुमारास अचानक… भाजप नेत्याच्या वाहनाची तोडफोड, व्हिडिओ आला समोर
भाजप नेत्याच्या घराबाहेर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या तारा तोडण्यात आल्याने हा हल्ला नियोजनबद्ध असावा, असा संशय कांबळे यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
भाजप नेते दिलीप कांबळे यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या दोन ते तीन वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. काल रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, कांबळे यांनी हा आपल्यावर करण्यात आलेला एक नियोजनबद्ध हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते संध्याकाळी बाहेर गेले असताना रात्री परतल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांच्या वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे, घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या तारा तोडण्यात आल्या होत्या, ज्यामुळे कोणतीही फुटेज उपलब्ध होऊ शकले नाही. यामुळे हल्लेखोरांनी हा हल्ला अत्यंत विचारपूर्वक केल्याचे स्पष्ट होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पीआय राठोड मॅडम आणि वासनिक मॅडम यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली. कांबळे यांनी लेखी तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी पंचनामा केला आहे. सध्या वॉचमन आणि त्यांच्या सुपरवायझर यांची चौकशी सुरू आहे. या हल्ल्यामागे नेमके कोण आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.
