PM मोदींच्या निवासस्थानाबाहेर E20 इंधन आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; थेट…

PM मोदींच्या निवासस्थानाबाहेर E20 इंधन आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; थेट…

| Updated on: Aug 04, 2026 | 12:15 PM

E20 इंधनाचा मुद्दा देशभरात गाजत आहे. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात सरकार मोठ्या कोंडीत अडकले. त्यानंतर आता E20 इंधनाचा वाद वाढला. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारच्या E20 इंधन धोरणात तीन महत्त्वाचे बदल करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले.

E20 इंधनाचा मुद्दा देशभरात गाजत आहे. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात सरकार मोठ्या कोंडीत अडकले. त्यानंतर आता E20 इंधनाचा वाद वाढला. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारच्या E20 इंधन धोरणात तीन महत्त्वाचे बदल करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले. आज 4 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या संपूर्ण मार्मगांवरील सुरक्षा व्यावस्था वाढवण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना आंदोलनाची परवानगी नकारली आहे. इतकेच नाही तर आता या परिषराला नो प्रोटेस्ट झोनसुद्धा घोषित करण्यात आले आहे.

केजरीवाल यांच्या मते, या निवेदनावर दोन लाखांहून अधिक लोकांनी डिजिटल स्वाक्षरी केल्या आहेत. इथेनॉल विरोधातील आपली मोहिम अधिक तीव्र आम आदमी पार्टी करत आहे. त्यामध्येच एक नवीन पाऊल उचलण्यात आले. वाहनचालकांचा आरोप आहे की, E20 पेट्रोलमुळे इंजिनचे नुकसान होत आहे. ज्यामुळे त्याच्या मायलेजवर परिणाम होत आहे. आता थेट नरेंद्र मोदी यांच्या घरावर मोर्चा निघणार आहे.

Published on: Aug 04, 2026 12:14 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us