इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा अन् तिकडे एकनाथ शिंदेंचा मोठा डाव, काय घडलं?

इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा अन् तिकडे एकनाथ शिंदेंचा मोठा डाव, काय घडलं?

| Updated on: Jun 27, 2026 | 1:08 PM

एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटातील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यवतमाळ दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे एकानथ शिंदेही काही आमदारांची बैठक घेणार असल्याचं चित्र आहे.

महाराष्ट्रातील राजकीय घडामोठींना सध्या वाऱ्याचं वेग आलं आहे. सर्व पक्षात जलद घडामोठी पहायला मिळत आहेत. एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटातील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यवतमाळ दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे एकानथ शिंदेही काही आमदारांची बैठक घेणार असल्याचं चित्र आहे. उद्धव ठाकरें यांनी आज त्यांच्या यवतमाळ दौऱ्यात त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रायगड येथे दाखल झाले आहेत. त्यांची रायगड जिल्यातील आमदारांसोबत बैठक सुरु आहे. या बैठकीत भरत गोगावले, मेहेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे उपस्थित आहेत. शिंदेंच्या बैठकीत योगेश कदम उपस्थित असल्याचंही सांगितलं जात आहे. यावेळी ते पक्षातील नेत्यांना कोणती सुचना देणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Published on: Jun 27, 2026 1:08 PM
Follow Us