DCM Eknath Shinde | उपसभापती पदासाठी धक्कातंत्र वापरल्यानंतर मोठी अपडेट समोर; स्वतः एकनाथ शिंदे दोन वाजता… काय घडणार?

DCM Eknath Shinde | उपसभापती पदासाठी धक्कातंत्र वापरल्यानंतर मोठी अपडेट समोर; स्वतः एकनाथ शिंदे दोन वाजता… काय घडणार?

| Updated on: Jun 30, 2026 | 1:20 PM

राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी शिंदे गटाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे.

राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी शिंदे गटाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे हा अर्ज अत्यंत गोपनीय पद्धतीने भरल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते. त्यामुळे या घडामोडींना अधिक राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनीही यावर प्रतिक्रिया देत ठाकरे गटावर निशाणा साधला. बालेकिल्ल्यातील नेतेच जर पक्ष सोडत असतील तर नेतृत्व कमकुवत झाल्याचे दिसते, असे ते म्हणाले.

ताज्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी 2 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते नेमकी कोणती घोषणा करणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान ठाकरेंचे काही आमदार शिंदे गटात येतील अशा चर्चा आहेत, याबाबत शिंदे काही म्हणतील का? हे पाहणंदेखील महत्त्वाचं ठरतंय.

Published on: Jun 30, 2026 1:20 PM
Follow Us