tv9 Marathi Special Report | दिव्य औषध, जल आणि चिंचोके… वन्यजीवांनाही सोडलं नाही, भोंदू खरातचे किळसवाणे कारनामे उघड; लैंगिक शोषणासह कोट्यवधींची लूट उघड

tv9 Marathi Special Report | दिव्य औषध, जल आणि चिंचोके… वन्यजीवांनाही सोडलं नाही, भोंदू खरातचे किळसवाणे कारनामे उघड; लैंगिक शोषणासह कोट्यवधींची लूट उघड

| Updated on: Mar 25, 2026 | 11:00 AM

धर्म आणि दिव्यशक्तीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या भोंदू खरात याच्या गैरकारभाराचा धक्कादायक उलगडा हळूहळू समोर येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, भोंदू खरातने अंधश्रद्धा आणि बनावट दाव्यांच्या जोरावर नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांची लूट केल्याचे उघड झाले आहे.

धर्म आणि दिव्यशक्तीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या भोंदू खरात याच्या गैरकारभाराचा धक्कादायक उलगडा हळूहळू समोर येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, भोंदू खरातने अंधश्रद्धा आणि बनावट दाव्यांच्या जोरावर नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांची लूट केल्याचे उघड झाले आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी विविध प्रकारचे तथाकथित “दिव्य” उपाय आणि वस्तू विकत असे. स्वतःला नागदेवतेची कृपा असल्याचा दावा करत तो लोकांना फसवत असे. पुरुषांसाठी शक्तिवर्धक औषध म्हणून तो बनावट उत्पादन विकत असल्याची माहिती असून, औषधांमध्ये संशयास्पद मिश्रण करून “ओश्नोजल” नावाने विक्री केल्याचा आरोप आहे. याशिवाय, बाजारात अत्यल्प किमतीत उपलब्ध असलेल्या साध्या खड्यांना “दिव्य खडे” म्हणून लाखो रुपयांना विकण्यात आले. “तुर्की मध” म्हणून एक किलो मधाची बाटली तब्बल नऊ लाख रुपयांना विकली जात असल्याचेही तपासात समोर आले आहे. तसेच “मंतरलेल्या चिंचोकी” घरात ठेवल्यास समृद्धी येते, असा दावा करत त्या हजारो रुपयांना विकल्या जात होत्या. अधिक गंभीर बाब म्हणजे, अघोरी पूजेसाठी वन्यजीवांशी संबंधित वस्तूंचा वापर केल्याचेही समोर आले आहे. यामध्ये कोल्हा, कस्तुरी आणि हरणांच्या शिंगांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. या सर्व प्रकरणात महिलांची फसवणूक, लैंगिक शोषण, तसेच शेतजमिनी बळकावल्याचे गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. अंधश्रद्धा पसरवून आणि लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत आरोपीने मोठे जाळे उभारल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रकरणात काही प्रभावशाली व्यक्तींचा संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, याबाबत सखोल चौकशी सुरू आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Published on: Mar 25, 2026 11:00 AM
Follow Us