Tukaram Mundhe : जिममधील प्रोटीन पावडरबाबत तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, आता लायसन्स अनिवार्य…

Tukaram Mundhe : जिममधील प्रोटीन पावडरबाबत तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, आता लायसन्स अनिवार्य…

| Updated on: Nov 21, 2026 | 8:40 AM

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार, आता जिम आणि फिटनेस सेंटर्समध्ये प्रोटीन पावडर व सप्लिमेंट्सच्या विक्रीसाठी अन्न सुरक्षा परवाना (लायसन्स) घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. ब्रँड मालक, आयातदार, वितरक, किरकोळ विक्रेते, औषधालये, व्यायामशाळा आणि रुग्णालये या सर्वांना हा नियम लागू असणार आहे.

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता प्रोटीन पावडर आणि इतर सप्लिमेंट्सवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या निर्देशानुसार, जिम आणि फिटनेस सेंटर्समध्ये सप्लिमेंट्सच्या विक्रीसाठी अन्न सुरक्षा परवाना (लायसन्स) घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नव्या नियमानुसार, सप्लिमेंट, न्यूट्रासिटिकल्स, विशेष आहार विषयक वापरासाठीचे अन्न, विशेष वैद्यकीय प्रयोजनासाठीचे अन्न, प्रीबायोटिक व प्रोबायोटिक अन्न आणि नॉव्हेल अन्न या सर्व उत्पादनांसाठी महाराष्ट्रात फुल्ली कंप्लायन्स ऑर्डर जारी करण्यात आली आहे.

या नियमावलीचा उद्देश ग्राहकांना सुरक्षित उत्पादने मिळावीत हा आहे. ब्रँड मालक, आयातदार, वितरक, गोदामांचे मालक, किरकोळ विक्रेते, औषधालये (फार्मासिस्ट), व्यायामशाळा (जिम) आणि रुग्णालये या सर्वांना हे आदेश लागू आहेत. ज्या ठिकाणी या उत्पादनांची विक्री होते, त्या सर्वांना फूड सेफ्टी किंवा एफडीएचे लायसन्स घेणे अनिवार्य आहे. या परवान्याशिवाय त्यांना अशी उत्पादने विकता येणार नाहीत किंवा साठवून ठेवता येणार नाहीत. एफडीएच्या या नव्या कठोर भूमिकेमुळे सप्लिमेंट्सच्या बाजारात पारदर्शकता येण्याची अपेक्षा आहे.

Published on: Nov 21, 2026 8:40 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us