tv9 Marathi Special Report | तुकाराम मुंढे परळीत येणार म्हणताच पानपट्ट्यांवर टाळे?; तर जरांगेंचा सरकारला थेट इशारा काय?
राज्यात अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धडक कारवायांची चर्चा सध्या राज्यभर होत आहे. भेसळखोर आणि प्रतिबंधित पदार्थांविरोधात सुरू असलेल्या या मोहिमेमुळे अनेक ठिकाणी प्रशासनाची कडक भूमिका दिसून येत आहे.

दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले आहे. प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना मुक्तपणे काम करण्याची संधी दिल्यास कायदा व सुव्यवस्था कशी सुधारू शकते, याचे उदाहरण म्हणजे तुकाराम मुंढे यांचे काम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांच्या बदलीबाबत सरकारने कोणताही निर्णय घेतल्यास त्याचे परिणाम होतील, असा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी दिला.
बीड जिल्ह्यातील परळी शहरात एफडीएच्या संभाव्य कारवाईच्या चर्चांमुळे गेल्या दोन दिवसांपासून अनेक पानपट्ट्या बंद असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तुकाराम मुंढे यांचे पथक परळीत दाखल होणार असल्याच्या चर्चांमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
एफडीएकडून सध्या गुटखा, अपायकारक सुपारी, प्रतिबंधित मसाले तसेच भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात राज्यभर विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या कारवायांमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाकडून पुढील काळात आणखी कठोर कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.