Nagpur | ठो ठो आवाज आला… एकदा नव्हे दोनदा… नागपूरमधल्या गजबजलेल्या भागात खळबळ आणि दहशत

Nagpur | ठो ठो आवाज आला… एकदा नव्हे दोनदा… नागपूरमधल्या गजबजलेल्या भागात खळबळ आणि दहशत

| Updated on: May 18, 2026 | 11:05 AM

नागपूर शहरातील कोठीपुरा महाल परिसरात गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहा जणांच्या टोळीने दोन वेळा गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हा गोळीबार वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आणि दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात दोन मुख्य आरोपींची ओळख पटली असून, ते एकमेकांना ओळखत असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वीही काही गुन्ह्यांमध्ये हे आरोपी एकत्र सहभागी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, आरोपींमधील जुना वाद आणि वर्चस्वाच्या संघर्षातून हा गोळीबार झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून, “हा प्रकार परिसरात दहशत निर्माण करण्यासाठीच करण्यात आल्याचे दिसत आहे,” असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

Published on: May 18, 2026 11:05 AM
Follow Us