NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून परीक्षा घेण्याची मागणी

NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून परीक्षा घेण्याची मागणी

| Updated on: May 19, 2026 | 3:04 PM

देशभरात चर्चेत असलेल्या NEET परीक्षेच्या वादात आता आणखी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते आलोक शर्मा आणि प्रिया शर्मा यांच्या वतीने सुप्रीम कोर्टात नवी याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमध्ये राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) ऐवजी पर्यायी स्वतंत्र यंत्रणेद्वारे NEET परीक्षा घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

याचिकेत परीक्षेतील गैरव्यवहार, पेपरफुटीचे आरोप आणि पारदर्शकतेवर उपस्थित झालेल्या प्रश्नांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच रद्द झालेल्या परीक्षेमुळे लाखो विद्यार्थ्यांचे मानसिक आणि आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करत संबंधित उमेदवारांना नुकसान भरपाई देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
यासोबतच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.
दरम्यान, NEET परीक्षेभोवती निर्माण झालेल्या वादामुळे देशभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, सुप्रीम कोर्टाच्या पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: May 19, 2026 03:02 PM
Follow Us