Nashik | नाशिक विधान परिषद जागेवर महायुतीतच चुरस; भाजप-शिंदे सेना आमनेसामने, दोन्ही पक्षांचा जागेवर दावा, कोणाला संधी मिळणार?

Nashik | नाशिक विधान परिषद जागेवर महायुतीतच चुरस; भाजप-शिंदे सेना आमनेसामने, दोन्ही पक्षांचा जागेवर दावा, कोणाला संधी मिळणार?

| Updated on: May 20, 2026 | 10:28 AM

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या 16 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेषतः नाशिक विधान परिषद मतदारसंघातील एका जागेवर महायुतीमधील भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतच चुरस निर्माण झाल्याचे चित्र आहे.

नाशिकमधून भाजपकडून गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय निलेश बोरा हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. तसेच भाजपाचे गणेश गीते यांचे नावही चर्चेत आहे. दुसरीकडे शिंदे गटाकडून आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी अंजुम कांदे यांचे नाव आघाडीवर असून अजय बोरस्ते आणि भाऊ चौधरी यांचीदेखील चर्चा सुरू आहे.
या मतदारसंघात एकूण 623 मतदार आहेत. भाजपकडे सर्वाधिक 190 मतदार असून शिंदे गटाकडे 171 मतं आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून या जागेवर दावा केला जात आहे.
दरम्यान, “ज्या जागांवर यापूर्वी शिवसेनेचे आमदार निवडून आले, त्या जागांवर शिवसेना दावा करणार,” असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीमध्येच मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: May 20, 2026 10:28 AM
Follow Us