fuel rate today : राज्यात व्हॅट कपातीनंतर पेट्रोल, डिझेल स्वस्त, नवे दर आजपासून लागू

| Updated on: Jul 15, 2022 | 9:40 AM

व्हॅटमध्ये कपात करण्यात आल्याने पेट्रोल (petrol) प्रति लिटर पाच रुपये तर डिझेल प्रति लिटर तीन रुपयांनी स्वस्त झाले आहे. नवे दर आजपासून लागू झाले आहेत.

Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामधील सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गुरुवारी पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कपात करण्याची घोषणा केली. व्हॅटमध्ये कपात करण्यात आल्याने पेट्रोल प्रति लिटर पाच रुपये तर डिझेल प्रति लिटर तीन रुपयांनी स्वस्त झाले आहे. नवे दर आजपासून लागू  झाले आहेत. राज्यात पेट्रोल, डिझेल स्वस्त झाल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.