Pune | किरण गोसावीच्या अडचणीत आणखीन वाढ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगेंची माहिती

| Updated on: Oct 30, 2021 | 3:23 PM

क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच किरण गोसावी याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशनमध्ये किरण गोसावीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. वानवडी पोलीस स्टेशनमध्येही आज दिवसभरात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी ‘टीव्ही 9’ ला दिली.

Follow us on

क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच किरण गोसावी याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशनमध्ये किरण गोसावीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. वानवडी पोलीस स्टेशनमध्येही आज दिवसभरात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी ‘टीव्ही 9’ ला दिली. तसेच शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी चिन्मय देशमुख गोसावीच्या विरोधात फरासखाना पोलीस स्टेशनला वेगळी तक्रार देणार आहे. त्यामुळे आता पोलीस याप्रकरणात पुढे काय कारवाई करणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

किरण गोसावीने परदेशात नोकरी लावण्याच्या बहण्याने फसवणूक केल्याप्रकरणी या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या चार जणांचे अर्ज आल्यावर पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पालघर जिल्ह्यातील एडवण येथील दोन तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी किरण गोसावी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. दोन तरुणांना परदेशात नोकरीनिमित्त पाठवण्यासाठी दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांची गोसावींनी फसवणूक केल्याचा दावा केला जात आहे.