Dhananjay Munde | थेट “भावी कॅबिनेट मंत्री…” बीडमधील मुंडेंच्या बॅनर्सची जोरदार चर्चा, तुम्ही पाहिलंत का?

Dhananjay Munde | थेट “भावी कॅबिनेट मंत्री…” बीडमधील मुंडेंच्या बॅनर्सची जोरदार चर्चा, तुम्ही पाहिलंत का?

| Updated on: Jul 14, 2026 | 11:50 AM

बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघात आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या शुभेच्छा बॅनर्सची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. काही कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनर्सवर त्यांचा उल्लेख "भावी कॅबिनेट मंत्री" असा करण्यात आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघात आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या शुभेच्छा बॅनर्सची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. काही कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनर्सवर त्यांचा उल्लेख “भावी कॅबिनेट मंत्री” असा करण्यात आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

माजलगाव शहरातील अनेक प्रमुख चौकांमध्ये हे बॅनर्स झळकले असून नागरिकांमध्ये विविध तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत. गेल्या वर्षी धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्याकडे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाची जबाबदारी होती.

दरम्यान, 15 जुलै रोजी होणारा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. त्यांनी समाजोपयोगी उपक्रम राबवण्यावर भर देण्याचे सांगितले आहे.

अजितदादांच्या निधनामुळे राज्यात शोकाचे वातावरण असून कमी पावसामुळे शेतकरी आणि नागरिक अडचणीत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे बॅनर्स, पोस्टर्स, मिरवणुका आणि इतर उत्सवी कार्यक्रम टाळण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Published on: Jul 14, 2026 11:50 AM
Follow Us