LPG Crisis | युद्धाचा मोठा फटका, गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी, विविध शहरांमध्ये लागल्या रांगा

| Updated on: Mar 13, 2026 | 7:18 PM

आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅसचा तुटवडा जाणवत असून, अनेक शहरांमध्ये नागरिकांना सिलेंडरसाठी मोठ्या प्रमाणावर रांगा लावाव्या लागत आहेत. काही ठिकाणी मोबाईल अॅप आणि ऑनलाइन बुकिंग अडचणींमुळे नागरिक थेट गॅस एजन्सीसमोर झुंबड घालताना दिसत आहेत. मुंबईत कांदिवलीमध्ये पोहिसर नंतर आता चारकोप येथे गॅससाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे

आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅसचा तुटवडा जाणवत असून, अनेक शहरांमध्ये नागरिकांना सिलेंडरसाठी मोठ्या प्रमाणावर रांगा लावाव्या लागत आहेत. काही ठिकाणी मोबाईल अॅप आणि ऑनलाइन बुकिंग अडचणींमुळे नागरिक थेट गॅस एजन्सीसमोर झुंबड घालताना दिसत आहेत. मुंबईत कांदिवलीमध्ये पोहिसर नंतर आता चारकोप येथे गॅससाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे, तर नवी मुंबईत नागरिक पहाटे 3 वाजल्यापासून रांगा लावत आहेत. पुण्यातील सिहंगड रस्त्यावरही घरगुती गॅससाठी नागरिकांची लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. रत्नागिरीमध्ये विविध गॅस एजन्सीच्या बाहेर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गॅस वितरणाचे नियम बदलल्यामुळे काही ठिकाणी ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. आधी 25 दिवसांचा सिलेंडर बुकिंग आता 45 दिवसांवर करण्यात आला असून, त्यामुळे ग्राहक वर्गात संताप आणि असंतोष दिसून येत आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांना गॅस मिळवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, प्रशासन आणि एजन्सींकडून उपलब्धतेत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

Published on: Mar 13, 2026 07:18 PM
Follow Us