Girish Mahajan | गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल प्रकरणात मोठा खुलासा
राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात संबंधित आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री गिरीश महाजन यांचे आक्षेपार्ह आणि बनावट फोटो तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. या प्रकारामुळे त्यांची बदनामी झाल्याचा आरोप करत सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास करत जळगाव सायबर पोलिसांनी भरत म्हस्के (वय 34) या आरोपीला अटक केली आहे. चौकशीदरम्यान आरोपीने आक्षेपार्ह फोटो तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणात आरोपीविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. सोशल मीडियावर बनावट आणि दिशाभूल करणारे फोटो प्रसारित करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही सायबर पोलिसांनी दिला आहे.