Goa Assembly Election 2022 : ‘गोव्यात येतो तेव्हा मनोहर पर्रिकरांची आठवण येते’

| Updated on: Feb 10, 2022 | 10:50 PM

पंतप्रधान मोदी यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांची आठवण काढली. जेव्हा कधी मी गोव्यात येतो तेव्हा मनोहर पर्रिकर यांची कमतरता भासते. तुम्हा गोवेकरांना तर त्यांची कमतरता नेहमी भासत असेल, असं मोदी म्हणाले.

Follow us on

पणजी : गोवा विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election) प्रचाराच्या रणधुमाळीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सहभागी झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात कोकणीतून केली. त्याचवेळी पंतप्रधान मोदी यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांची आठवण काढली. जेव्हा कधी मी गोव्यात येतो तेव्हा मनोहर पर्रिकर यांची कमतरता भासते. तुम्हा गोवेकरांना तर त्यांची कमतरता नेहमी भासत असेल, असं मोदी यांनी म्हटले आहे.