Gold -Silver Rate | सोन्याने मोडले सर्व विक्रम! 10 ग्रॅमचा भाव 1.55 लाखांच्या पार, तर चांदीचा भाव काय?

Gold -Silver Rate | सोन्याने मोडले सर्व विक्रम! 10 ग्रॅमचा भाव 1.55 लाखांच्या पार, तर चांदीचा भाव काय?

| Updated on: Jun 15, 2026 | 11:22 AM

जागतिक घडामोडींचा परिणाम देशांतर्गत बाजारावर दिसून येत असून, महाराष्ट्रातील जळगाव सराफा बाजारातून सोन्या-चांदीच्या दराबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सोमवार, 15 जून रोजी सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली असून, त्यामुळे ग्राहकांची चिंता वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव सराफा बाजारात सोन्याच्या दरात तब्बल 3 हजार रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर 10 ग्रॅम सोन्याची किंमत जीएसटीसह 1 लाख 55 हजार 530 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागू शकतो.

दुसरीकडे, चांदीच्या दरातही मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. चांदीचे दर तब्बल 6 हजार रुपयांनी वाढले असून, एक किलो चांदीची किंमत जीएसटीसह 2 लाख 61 हजार 620 रुपयांवर पोहोचली आहे.

सराफा व्यावसायिकांच्या मते, जागतिक बाजारातील घडामोडी, आर्थिक अनिश्चितता आणि गुंतवणूकदारांचा वाढता कल यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये चढ-उतार होत आहेत. दरम्यान, सोनं आणि चांदीच्या वाढत्या दरांमुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात बाजाराची दिशा काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jun 15, 2026 11:22 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us