Jalgaon Gold Price | जळगाव सराफ बाजारात सोनं-चांदी महागलं; 24 तासांत विक्रमी दरवाढ
जळगावच्या सराफ बाजारात गेल्या 24 तासांत सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. सोन्याच्या दरात तब्बल सुमारे 3 हजार रुपयांची वाढ झाली असून, चांदीच्या दरातही सुमारे 7 हजार रुपयांनी वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या महिनाभरात जळगाव सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली होती.
जळगावच्या सराफ बाजारात गेल्या 24 तासांत सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. सोन्याच्या दरात तब्बल सुमारे 3 हजार रुपयांची वाढ झाली असून, चांदीच्या दरातही सुमारे 7 हजार रुपयांनी वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या महिनाभरात जळगाव सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. त्यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी दिलासा मिळाला होता. मात्र, अचानक झालेल्या या दरवाढीमुळे बाजारात पुन्हा चढ-उतार दिसून येत आहेत.
दरवाढीमुळे विशेषतः लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता आहे. सोन्या-चांदीचे दर वाढल्याने दागिन्यांच्या खरेदीवर परिणाम होणार असून, अनेकांना आपला बजेट पुन्हा आखावा लागणार आहे.
सराफ व्यावसायिकांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल आणि मागणी-पुरवठ्याच्या समीकरणामुळे ही दरवाढ झाली असावी. सध्या तरी दर स्थिरावतात की आणखी वाढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
