Gunaratna Sadavarte : राज ठाकरेंच्या बुडाला गुदगुल्या… हिंदी बोलेंगे, पढेंगे कोई रोक सके तो…,सदावर्तेंचं थेट चॅलेंज

Gunaratna Sadavarte : राज ठाकरेंच्या बुडाला गुदगुल्या… हिंदी बोलेंगे, पढेंगे कोई रोक सके तो…,सदावर्तेंचं थेट चॅलेंज

| Updated on: Jun 20, 2025 | 5:27 PM

हिंदी भाषा सक्तीला विरोध करणं हे अक्षम्य आहे. हे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव आहे, असा आरोप सदावर्तेंनी राज ठाकरेंवर आरोप केला. त्यामुळे शिक्षक आणि पालकांची हात जोडून माफी मागितली पाहिजे, अशी मागणी सदावर्तेंनी केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधातील तक्रारीनंतर गुणरत्न सदावर्ते यांना मनसे कार्यकर्त्याने धमकी दिल्याचे पाहायला मिळाले. यासंदर्भात बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, ‘राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे ही जोडगोळी आहे. राज ठाकरे यांची निंदा किती करावी, तेवढी कमी आहे. काय बोलायचं? मनसे पक्ष बोलतोय नागरिकांना ज्ञानार्जनापासून थांबवा.. हिंदी बोलेंगे, हिंदी पढेंगे कोई रोक सके तो रोकलो.. हिंदी भाषा शिकण्यात वाईट काय?’ असा सवाल करत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना थेट आव्हानच दिल्याचे पाहायला मिळत आहे. पुढे ते असेही म्हणाले, बुडाला गुदगुल्या होतायत.. आता निवडणूक आयोगाने मनसे या पक्षाला बंदी घातली पाहिजे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो जो ज्ञान्याच्या आड येईल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे.

Published on: Jun 20, 2025 05:26 PM