Harshada Deshmukh : Maharashtra MLC Election Final Results 2026 : कोटा पूर्ण करण्यासाठी हर्षदा देशमुख यांना किती  मतांची गरज; पुणे पदवीधर निवडणुकीत काय घडणार?

Harshada Deshmukh : Maharashtra MLC Election Final Results 2026 : कोटा पूर्ण करण्यासाठी हर्षदा देशमुख यांना किती मतांची गरज; पुणे पदवीधर निवडणुकीत काय घडणार?

| Updated on: Oct 28, 2026 | 8:17 AM

मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना ५४,०९५ मतं मिळाली असून, महायुतीचे सतीश चव्हाण ४३,१०१ मतांसह पिछाडीवर आहेत. एकूण १,४०,५४३ मतं मोजण्यात आली असून, पाटील यांनी निर्णायक आघाडी कायम ठेवली आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला काल सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत दोन फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांनी सुरुवातीपासूनच आपली आघाडी कायम राखली आहे.

दुसऱ्या फेरीअखेर एकूण १ लाख ४० हजार ५४३ मतं मोजून झाली आहेत. त्यापैकी १ लाख २८ हजार ७०७ मतं वैध ठरली आहेत. वैध मतांपैकी प्रतापसिंह पाटील यांना ५४ हजार ९५ मतं मिळाली आहेत, तर महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना ४३ हजार १०१ मतं मिळाली आहेत. याचबरोबर, ठाकरे शिवसेनेचे उमेदवार दिलीप भुगे यांना ६ हजार २१८ मतं प्राप्त झाली आहेत.

पहिल्या फेरीतील आकडेवारीनुसार, प्रतापसिंह पाटील यांना १७,७०४ मतं, तर सतीश चव्हाण यांना १२,७३८ मतं मिळाली होती. त्यावेळी प्रतापसिंह पाटील ४,९६६ मतांनी आघाडीवर होते. आता दुसऱ्या फेरीअखेर त्यांचे मताधिक्य अधिक वाढले आहे, ज्यामुळे मराठवाडा पदवीधर निवडणुकीत त्यांनी निर्णायक आघाडी घेतली असल्याचे स्पष्ट झाले आहे. मतमोजणीच्या पुढील फेऱ्यांमध्ये काय घडामोडी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

Published on: Oct 28, 2026 8:12 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us