Harshwardhan Sapkal | दिलगीरी ट्वीट नंतर मी सुनेत्रा पवार यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र… सपकाळ नेमकं काय म्हणाले?
काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘गुंगी गुडिया’ म्हटल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. या वक्तव्यावरून काँग्रेसवर चहूबाजूंनी टीका झाली होती. त्यामुळे काँग्रेसला बॅकफूटवर जात दिलगिरी व्यक्त करावी लागली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या वक्तव्यामुळे आक्रमक झाले होते. राज्यभरात काँग्रेसविरोधात आंदोलनं करण्यात आली होती. सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या टिप्पणीबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती.
“या संदर्भात काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जे काही चुकीचं आहे, ते चुकीचं आहे. स्त्रीदाक्षिण्य आमच्यासाठी सर्वोतोपरी आहे. एका प्रसंगाच्या अनुषंगाने केलेली टिप्पणी व्यक्तीगत घेऊन विपर्यास करु नये. काँग्रेसकडून खेद व्यक्त करणारं टि्वट करण्यात आलय. हा अनावश्यक मुद्दा आहे. यावर अधिक बोलणं उचित नाही” असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
ट्विटनंतर त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्या काही कामात असल्यामुळे संपर्क होऊ शकला नव्हता. पक्षाने ट्वीट करून आपली बाजू स्पष्ट केली होती.