Jalgaon Weather Update | लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू: नवा संसार उद्ध्वस्त!

Jalgaon Weather Update | लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू: नवा संसार उद्ध्वस्त!

| Updated on: May 14, 2026 | 4:13 PM

जळगाव जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असून, दोन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यात तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर जामनेर आणि अमळनेर तालुक्यातील दोन व्यक्तींनी जीव गमावल्याची माहिती समोर आली आहे.

जामनेर तालुक्यातील मोहाडी येथे वैशाली सुनील मोरे या 20 वर्षीय नवविवाहितेचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, अवघ्या 20 दिवसांपूर्वीच तिचा विवाह झाला होता. प्रकृती बिघडल्यानंतर तिला प्राथमिक उपचार करून जळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, दुसरी घटना अमळनेर तालुक्यातील बहादरपूर येथे घडली. 69 वर्षीय पुजारी प्रवासादरम्यान अमळनेर बसस्थानकात अचानक चक्कर येऊन कोसळले. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दोन्ही मृत्यूंमध्ये उष्माघाताची लक्षणे आढळली असली तरी, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Published on: May 14, 2026 04:02 PM
Follow Us