Sanjay Raut | केवळ ताकद असून चालत नाही, मुख्यमंत्री होण्यासाठी भाग्यही लागते; संजय राऊत यांचं विधान

Sanjay Raut | केवळ ताकद असून चालत नाही, मुख्यमंत्री होण्यासाठी भाग्यही लागते; संजय राऊत यांचं विधान

| Updated on: Feb 01, 2026 | 11:04 AM

शरद पवारांच्या राजकीय भूमिकांबाबत आणि अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शक्यतेवरून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यावर भाष्य करताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. संजय राऊत म्हणाले की, 'जर शरद पवारांच्या मनात असते तर अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नक्कीच झाले असते.

शरद पवारांच्या राजकीय भूमिकांबाबत आणि अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शक्यतेवरून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यावर भाष्य करताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. संजय राऊत म्हणाले की, ‘जर शरद पवारांच्या मनात असते तर अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नक्कीच झाले असते. ते पूर्णपणे अशक्य नव्हते. मात्र त्या काळातील राजकीय परिस्थिती वेगळी होती. राऊत पुढे म्हणाले की, त्या काळात प्रणव मुखर्जी हे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होते आणि केंद्रात तसेच राज्यात सत्तास्थापनेबाबत अनेक घडामोडी सुरू होत्या. त्यामुळे सरकार स्थापन करण्याबाबतची चर्चा फारशी पुढे जाऊ शकली नाही. जर शरद पवारांनी त्या वेळी भूमिका अधिक ठामपणे ताणून धरली असती, तर कदाचित अजित पवारांना मुख्यमंत्रीपद मिळालं असतं. पण शरद पवारांचा स्वभाव तसा नाही. ते राजकारणात गोष्टी ताणून धरणारे नेते नाहीत. ते नेहमी संयमाची आणि समजूतदारपणाची भूमिका घेत आले आहेत, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. राजकारणात केवळ ताकद असून चालत नाही, मुख्यमंत्री होण्यासाठी भाग्यही लागते, असं देखील राऊत म्हणाले.

 

Published on: Feb 01, 2026 11:04 AM