
Crime | Navi Mumbai | बापानेच पोरावर गोळ्या झाडल्या, मुलाचा मृत्यू, महाराष्ट्र हादरला!
नवी मुंबईमध्ये एका बापानेच स्वत:च्या पोराला गोळ्या झाडून त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेन संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने मुलाची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडली आहे. या गोळीबाराचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. गाडीच्या सर्व्हिसिंगच्या पैशांवरुन बाप-लेकामध्ये वाद झाला होता. त्यानंतर संतापाच्या भरात भगवान पाटीलने मुलांवर गोळीबार केल्याचा आरोप आहे. मोठा मुलगा विजय पाटीलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर धाकटा मुलगा सुजय पाटील जखमी आहे.
निवृत्त पोलीस अधिकारी भगवान पाटीलने गुन्हा मान्य केला आहे. काल (सोमवारी) संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भगवान पाटीलने मुलांवर गोळीबार केला होता. जखमी अवस्थेत दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल केले होते, परंतु गंभीर जखमी झालेला मोठा मुलगा विजय पाटीलचे इंद्रावती रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. तर जखमी सुजयवर उपचार सुरु आहेत.
Related Video
कॉक्रोचनंतर खरगोश जनता पार्टी चर्चेत; काय आहे नवी भानगड?
महापौर कार्यालय उडवून देणार! पुण्यात धमकीचा मेल, महापालिकेत एकच खळबळ
गाडी, कॅबिनसह तुला... मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी; थेट
भारताचा नवा विश्वासू मित्र इराण समोर झुकला, 3 अब्ज डॉलरची डील
राजा शिवाजी चित्रपट बघताच शिल्पा शेट्टी हिने काढली रितेश देशमुखची नजर
महापौर कार्यालय उडवून देणार! पुण्यात धमकीचा मेल, महापालिकेत एकच खळबळ
गाडी, कॅबिनसह तुला... मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी; थेट
पुरुषोत्तमपुरीत भीषण दुर्घटना! 50 भाविकांची बोट पलटी, एक बालक बेपत्ता
'विरोधी पक्षात असाल तर थेट कारवाई...' वर्धापन दिनाच्या भाषणादरम्यान
Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त