NCP Crisis | राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल? राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष उफाळला

NCP Crisis | राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल? राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष उफाळला

| Updated on: May 18, 2026 | 10:07 AM

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत अस्वस्थता वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या घडामोडींमुळे आमदारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. पक्षातील विविध गटांमध्ये मतभेद वाढत असल्याचेही बोलले जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादीतील एका गटाकडून वरिष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांना समर्थन दिले जात आहे. तर दुसरीकडे काही आमदार पार्थ पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेच्या समर्थनात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्षामध्ये दोन वेगवेगळे गट सक्रिय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दरम्यान, पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीला सुनेत्रा पवार यांचे समर्थन असल्यामुळेच पक्षात या घडामोडींना वेग आल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, आगामी काळात पक्षातील समीकरणे कोणते वळण घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Published on: May 18, 2026 10:07 AM
Follow Us