Pune | इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग, महिलांमध्ये नाराजी

Pune | इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग, महिलांमध्ये नाराजी

| Updated on: Mar 07, 2026 | 5:38 PM

इराण–इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पुणे शहरातील अनेक महिलांनी या दरवाढीबाबत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. महिलांचे म्हणणे आहे की, घरगुती सिलेंडरच्या दरात झालेली वाढ त्यांच्या आवाक्याबाहेरची आहे.

इराण–इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पुणे शहरातील अनेक महिलांनी या दरवाढीबाबत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. महिलांचे म्हणणे आहे की, घरगुती सिलेंडरच्या दरात झालेली वाढ त्यांच्या आवाक्याबाहेरची आहे. आधीच वाढत्या महागाईमुळे घरखर्चाचे गणित सांभाळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत सिलेंडरच्या किंमतीत झालेली वाढ कुटुंबाच्या बजेटवर मोठा परिणाम करत असल्याचे त्यांनी सांगितले. सिलेंडरच्या दरात सुमारे ६० रुपयांची वाढ झाल्याने गरीब आणि हातावर पोट असलेल्या कुटुंबांसाठी परिस्थिती अधिक कठीण झाली आहे. “आमचे उत्पन्न मर्यादित आहे. रोजच्या गरजा भागवताना ही दरवाढ आम्हाला परवडणारी नाही,” अशी प्रतिक्रिया काही महिलांनी दिली. दरम्यान, वाढत्या गॅस दरामुळे घरखर्चाचा ताळमेळ बसवणे अवघड झाले असल्याची खंत महिलांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी काहीतरी दिलासा देणारी तरतूद करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Published on: Mar 07, 2026 05:37 PM
Follow Us