Iran | इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?
आखाती देशातील युद्धाची धग अजूनही पेटलेली असल्याचेच दिसून येत आहे. अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अटी मान्य करणार नाही असं सागितलं आहे. यावर इराणनेही अमेरिकेला थेट इशारा दिला आहे, नेमकं काय घडलं?
आखाती देशातील युद्धाची धग अजूनही पेटलेली असल्याचेच दिसून येत आहे. अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अटी मान्य करणार नाही असं सागितलं आहे. इतकेच नाही तर इराण हा कंगाल राष्ट्र आहे असे देखील सांगितले. यावर अटी मान्य न केल्यास चर्चा न करताच निघून जाणार असा थेट इशारा इराणनं दिला आहे. लॅबनन आणि गोठवलेली संपत्ती सोडणार नाही असं देखील इराणनं सांगितलं.
दरम्यान अमेरिका दोन अटी मान्य करणार होता असा दावा इराणनं केला आहे. अखरे इराणनं आम्ही पुन्हा युद्धासाठी तयार असल्याचं सांगितलं आहे. एकूणच दोन आठवड्यांसाठी थांबवण्यात आलेलं युद्ध पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे.
Published on: Apr 11, 2026 7:59 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
