शिवसैनिकांचं कर्तव्य असतं आदेशांचं पालन करणं ! संजय पवारांचं वक्तव्य

शिवसैनिकांचं कर्तव्य असतं आदेशांचं पालन करणं ! संजय पवारांचं वक्तव्य

Rachana Bhondave | Updated on: May 24, 2022 | 6:26 PM

आपल्या नावाची घोषणा झाल्यानंतर संजय पवार चांगलेच आनंदी झाले आहेत. माध्यमांशी बोलताना पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे आभार मानले. तसंच खूप आनंदी असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिलीय. ‘मी शिवसेना प्रमुखांना, उद्धव ठाकरेंना देव मानतो, मातोश्रीला मंदिर मानतो’, असंही संजय पवार यावेळी म्हणाले.

कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर आता राज्यसभेसाठी शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. कोल्हापूर (Kolhaur)चे जिल्हाप्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांचं नाव शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून जाहीर करण्यात आलं आहे. आपल्या नावाची घोषणा झाल्यानंतर संजय पवार चांगलेच आनंदी झाले आहेत. माध्यमांशी बोलताना पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. तसंच खूप आनंदी असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिलीय. ‘मी शिवसेना प्रमुखांना, उद्धव ठाकरेंना देव मानतो, मातोश्रीला मंदिर मानतो’, असंही संजय पवार यावेळी म्हणाले.

Published on: May 24, 2022 6:26 PM
Follow Us