पुलाचं काम करून थकलेल्या मजुरांवर झोपेतच काळाचा घाला, वाळूखाली दबून 5 मृत्यूमुखी

पुलाचं काम करून थकलेल्या मजुरांवर झोपेतच काळाचा घाला, वाळूखाली दबून 5 मृत्यूमुखी

| Updated on: Feb 22, 2025 | 11:14 AM

दिवसभर पुलाचं काम करून थकले भागले जीव रात्री जेवून झोपेच्या अधीन झाले पण ते उठलेच नाहीत. वाळूच्या टिप्परच्या रुपाने आलेल्या मृत्यूने झोपेतच 5 मजुरांवर घाला घातला. जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे मजुराच्या पत्र्याच्याशेड जवळ वाळूचा टिप्पर खाली केल्याने पाच मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला

दिवसभर पुलाचं काम करून थकले भागले जीव रात्री जेवून झोपेच्या अधीन झाले पण ते उठलेच नाहीत. वाळूच्या टिप्परच्या रुपाने आलेल्या मृत्यूने झोपेतच 5 मजुरांवर घाला घातला. जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे मजुराच्या पत्र्याच्याशेड जवळ वाळूचा टिप्पर खाली केल्याने पाच मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला. जाफराबाद तालुक्यातील पासोडी – चांडोळ रस्त्यावरील पुलाचे काम करणारे हे मजूर होते. या दुर्घटनेत 5 जण ठार झाले आहेत. मात्र एक 13 वर्षीय मुलगी आणि एका महिलेला वाचवण्यात यश मिळालं आहे.

जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी चांडोळ रस्त्यावरील पुलाचे काम सुरू असून या पुलाचे काम करणारे मजूर पुलाशेजारीच पत्र्याचं शेड बांधून राहत होते. मध्यरात्री गाढ झोपेत असतानाच एका वाळूच्या टिप्परने त्यांच्या पत्र्याच्या शेडशेजारी वाळू खाली केल्याने त्या वाळूमध्ये दबून या पाच मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जाफराबाद पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ते पुढील तपास करत आहे.

Published on: Feb 22, 2025 11:13 AM
Follow Us