बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले – जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो पण प्रमाणपत्र रद्द केल्यामुळे मनातून उतरले असं जरांगे यांनी म्हटले. प्रमाणपत्र रद्द केल्यामुळे तळपायाची आग मस्तकात गेली असंही जरांगे म्हणतात. सरकार फार तर जीव घेईल सांगता सभेतून जरांगेंचा हा हल्लाबोल. साडेसाती बावनकुळेंनी गळ्यात घेतली म्हणत भुजबळ आता खुश असतील. सोलापुरात जरांगेंची आज रात्री दीड वाजता सांगता सभा पार पडली आणि त्यात त्यांनी […]
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो पण प्रमाणपत्र रद्द केल्यामुळे मनातून उतरले असं जरांगे यांनी म्हटले. प्रमाणपत्र रद्द केल्यामुळे तळपायाची आग मस्तकात गेली असंही जरांगे म्हणतात. सरकार फार तर जीव घेईल सांगता सभेतून जरांगेंचा हा हल्लाबोल. साडेसाती बावनकुळेंनी गळ्यात घेतली म्हणत भुजबळ आता खुश असतील. सोलापुरात जरांगेंची आज रात्री दीड वाजता सांगता सभा पार पडली आणि त्यात त्यांनी हे वक्तव्य केलय. त्या माणसाला शंभर टक्के नवाजत होतो. चांगलं म्हणत होतो. पण त्यांनी प्रमाणपत्र रद्द केल्यापासून माझ्या डोक्यातूनच उतरला, माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली. काय करील सरकार? घेऊन घेऊन जीवच घेईल. जीव वाचवण्यासाठी समाजाचं गळू नात नाही बांधायचं. समाजाचे लेकरं जाळात फेकून होरपळू नाही द्यायचे. असं रक्त आपलं नाहीये. बावनकुळ्याचं पत्र हाती लागल्याबरोबर मी फोन करून सांगितलं बावनकुळ्याने असं असं केलंय. त्याला चूक दुरुस्त कर म्हणा दीड महिन्यापूर्वीच. सध्या सगळ्यात जास्त खुश असेल तर छगन भुजबळ. ते म्हणत असतील बावनकुळ्या, ते आरक्षणाचं तुम्ही लफडं… ही साडेसाती तुझ्या गळ्यात घातली लई चांगलं झालं मी मोकळा. तो जर अर्ध्या हंडीत असेल आता, तर दोन हंडीत जाऊन निवांत झोपत असेल.
