
Jayakwadi Dam | जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग सुरु, धरणाचे 4 दरवाजे उघडले
जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीमध्ये झपाटयाने वाढ होत आहे.धरणाचा जलसाठा 95% झाल्याने गोदावरी नदीमध्ये जायकवाडी धरणातुन पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीमध्ये झपाटयाने वाढ होत आहे.धरणाचा जलसाठा 95% झाल्याने गोदावरी नदीमध्ये जायकवाडी धरणातुन पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी,पुर्वानुभव पाठीशी धरुन गोदाकाठच्या गावात राहणा-या सर्व नागरिकांनी शेतामध्ये असणारा शेतीमाल, शेतीऔजारे तसेच पाळीव प्राणी, जनावरे यांना सुरक्षित स्थळी हलवणे गरजेचे आहे. घरामध्ये राहणारे वयोवृध्द, लहान मुलं, महिला या सर्वांना सुरक्षित ठिकाणीच ठेवणे आवश्यक आहे. कोणाच्याही मालाची अथवा जिवीत हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असं ट्वीट राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...