Jejuri Khandoba Yatra : सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर भक्तीचा महापूर; पहाटे 5 वाजता शाही स्नानासाठी पालखी रवाना, पाहा भक्तिमय सोहळा
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर सोमवती अमावस्येनिमित्त राज्यभरातून हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. मंदिर आकर्षक फुलांनी सजवले आहे. यळकोट यळकोट जय मल्हारच्या गजरात भाविकांनी भंडारा उधळत, भक्तीमय वातावरणात शाही स्नान पालखी सोहळा साजरा केला. दिवाळी आणि अमावस्येचा योग असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे.
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर सोमवती अमावस्या यात्रेचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यभरातून हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. या विशेष दिवसाच्या निमित्ताने मंदिर गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
सकाळी ठीक पाच वाजता जेजुरी गडावरून शाही स्नानासाठी पालखी मार्गस्थ झाली. या वेळी यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. आजही मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी आहे. ऐन दिवाळीमध्ये सोमवती अमावस्या आल्याने भाविकांमध्ये अधिक उत्साह दिसून येत आहे. श्री क्षेत्र जेजुरीचा खंडेरायाचा गड अक्षरशः पिवळ्या सोन्याने नाहून निघाला आहे. मोठ्या प्रमाणावर भंडारा उधळण्यात येत असून, यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष अखंड सुरू आहे. सोमवती अमावस्या आणि दिवाळी निमित्ताने मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे.
