चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट…व्हिडीओ व्हायरल

चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट…व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Jun 06, 2026 | 6:54 PM

कल्याण येथील खडकपाडा परिसरात अल्पवयीन मुलांसह आजोबांचा स्टंटबाजीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भरधाव वेगात स्कूटर चालवत जीव धोक्यात घालणाऱ्या चार मुलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी तातडीने कारवाई केली.

कल्याण येथील खडकपाडा परिसरात अल्पवयीन मुलांसह आजोबांचा स्टंटबाजीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भरधाव वेगात स्कूटर चालवत जीव धोक्यात घालणाऱ्या चार मुलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी तातडीने कारवाई केली. या प्रकरणात संबंधित स्कूटर जप्त करण्यात आली असून मुलांच्या कुटुंबियांनाही मोठा दंड भरावा लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका स्कूटरवर आजोबांसह 4 अल्पवयीन मुले बसून धोकादायक पद्धतीने प्रवास करत होती. व्हायरल व्हिडिओची दखल घेत कल्याण वाहतूक विभागाने तपास सुरू केला. तपासादरम्यान वाहनाचा मालक आणि चालकाची माहिती समोर आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कूटर चालवणारा मुलगा हा 13 वर्षांचा असून त्याने घरातील चावी घेऊन मित्रांसह स्कूटर बाहेर नेली होती. या प्रकरणात मुलाच्या आजोबांना तब्बल 23 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Published on: Jun 06, 2026 6:53 PM
Follow Us