Karuna Sharma : ‘मुंडे खोटारडा माणूस, दर दिवशी नवीन बायका… ही सवय खूप घाण…’, करूणा शर्मांचा मोठा गौप्यस्फोट

Karuna Sharma : ‘मुंडे खोटारडा माणूस, दर दिवशी नवीन बायका… ही सवय खूप घाण…’, करूणा शर्मांचा मोठा गौप्यस्फोट

| Updated on: Apr 10, 2025 | 3:46 PM

धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील संबंध हे लग्नासाखेच आहेत, असे माझगाव सत्र न्यायालयाने म्हटले. न्यायालयाच्या निकालावर करूणा शर्मा यांनी पहिल्यांदा कॅमेऱ्यावर आपली प्रतिक्रिया दिली.

“धनंजय मुंडे हा खोटारडा माणूस आहे. आमचं लग्न झालं होतं, हे न्यायालयाने सांगितलेलं आहे. 27 वर्ष कोणी लग्नाशिवाय कसं राहू शकतं. त्यांनी त्यांच्या याचिकेत करूणा शर्मा माझी पत्नी नसल्याचे म्हटलं. मी त्यांची बायकोच नाही असं धनंजय मुंडे यांचं म्हणणं आहे. आमच्यात 1996 सालापासून रिलेशन आहे. आमचं 1998 साली लग्न झालं आहे. लग्नानंतर आम्ही जून 2023 मध्ये पहिल्यांदा घर घेतलं. त्याआधी आम्ही एका घरात भाड्याने राहायचो. मला म्हाडाच्या रुममध्ये ठेवलं. न्यायाधीशांनीही त्यांच्या वकिलांना तेच सांगितलं की तुम्हाला कोणताही आक्षेप होता तर तुम्ही एवढी वर्षे गप्प का होते? ” अशी माहिती करुणा मुंडे यांनी दिली. पुढे त्या असंही म्हणाल्या, धनंजय मुंडेंना वाटलं मी मंत्री म्हणजे कायपण होऊ शकतं ही महिला गप्प बसेल पण मुंडेंना माझी लढण्याची वृत्ती माहिती होती. मात्र त्यांच्या दलाल लोकांना वाटत होतं की करोडो रूपये दिले की मी शांत बसेल मात्र मी कोणी नाच-गाण्यावाली बाई नाही, मी रखेल नाही. मी मुंडेंवर प्रेम केलं, असंही करूणा शर्मा यांनी सांगितले. 27 वर्ष मी माझ्या नवऱ्याला साथ दिली आहे. पण आज मुंडे मंत्री झाल्यानंतर त्यांच्या पैशावर नाच-गाणं करणाऱ्या बायका ऐश करत आहे आणि मी कशाचा त्याग केला. दर दिवशी नवीन बायका… ही सवय खूप घाण… याचे सगळे पुरावे मी कोर्टात सादर करणार आहे, असं म्हणत करूणा शर्मांनी इशाराच दिलाय.

Published on: Apr 10, 2025 03:46 PM