सिया केतन प्रकरण! केतनच्या बहिणीची भावनिक हाक; न्यायासाठी थेट…..

सिया केतन प्रकरण! केतनच्या बहिणीची भावनिक हाक; न्यायासाठी थेट…..

| Updated on: Jul 18, 2026 | 12:29 PM

केतन अग्रवाल यांच्या निधनाला आज 1 महिना पूर्ण झाला असून, या पार्श्वभूमीवर त्यांच्या कुटुंबीयांनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन न्यायासाठी प्रार्थना केली. यावेळी केतन अग्रवाल यांच्या बहिणीने माध्यमांशी संवाद साधताना भावनिक प्रतिक्रिया देत, आपल्या भावाला लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी मागणी केली.

केतन अग्रवाल यांच्या बहिणीने सांगितले की, आज भावाच्या निधनाला 1 महिना झाला असून, त्याचा आवाज आणि हसू खूप आठवत आहे. तो जिथे कुठे असेल तिथे शांततेत राहावा आणि त्याला न्याय मिळावा, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी आज त्यांच्या आजोबांचा वाढदिवस असल्याचाही उल्लेख केला. अशा दिवशी भावाच्या आठवणी अधिक वेदनादायक असल्याचे त्या म्हणाल्या. त्यामुळे संपूर्ण कुटुंबासाठी हा काळ अत्यंत कठीण असल्याचे त्यांनी नमूद केले.

सिया गोयल यांच्यावर संशय कसा आला, असा प्रश्न विचारण्यात आला असता, त्याबाबतचा संपूर्ण खुलासा न्यायालयीन सुनावणीदरम्यान होईल, असे केतन अग्रवाल यांच्या बहिणीने स्पष्ट केले. दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून, कुटुंबीयांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला आहे.

Published on: Jul 18, 2026 12:29 PM
Follow Us