Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर

Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर

| Updated on: Jul 03, 2026 | 6:04 PM

पुण्यातील गाजलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सिया गोयल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. न्यायालयात हजर करण्यासाठी आणण्यात आले असताना माध्यमांचे कॅमेरे पाहून सियाने केलेल्या वर्तनामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. तिच्या या कृतीवर सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात असून, अनेकांनी याला माजोरडेपणाचे उदाहरण असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

माहितीनुसार, केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी माध्यमांचे कॅमेरे पाहताच सिया गोयलने केलेल्या कथित हावभाव आणि वर्तनामुळे उपस्थितांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आरोपीच्या वर्तनावर टीका केली आहे.

दरम्यान, या प्रकरणात न्यायालयाने सिया गोयल आणि चेतन या दोन्ही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, मावळ न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले.

केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास सध्या सुरू असून, न्यायालयीन प्रक्रियेकडे आणि पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, न्यायालयात आरोपीच्या कथित वर्तनावरून सोशल मीडियावरही तीव्र चर्चा सुरू झाली आहे.

Published on: Jul 03, 2026 6:04 PM
Follow Us