काही काळातच मोठं घडलं; ठाकरे गटातील बंडखोर नेत्याला मोठा धक्का; पक्षाने थेट लेकाला…

काही काळातच मोठं घडलं; ठाकरे गटातील बंडखोर नेत्याला मोठा धक्का; पक्षाने थेट लेकाला…

| Updated on: Jun 22, 2026 | 12:55 PM

उद्धव ठाकरे यांची साथ सोडून खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्ते त्यांच्यावर जोरदार टीका करत आहेत.

उद्धव ठाकरे यांची साथ सोडून खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्ते त्यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही आष्टीकर कुटुंबावर निशाणा साधला होता. त्यानंतर नागेश आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा पाटील आष्टीकर यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका स्पष्ट केली.

कृष्णा आष्टीकर म्हणाले की, “मी अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे. मी सर्व घडामोडी मिलिंद नार्वेकर यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. सुषमा अंधारे यांनी आमच्या कुटुंबावर केलेली टीका चुकीची आहे.” तसेच त्यांनी, “वडील एका पक्षात आणि मुलगा दुसऱ्या पक्षात असणे नवीन नाही,” असेही म्हटले.

दरम्यान, नांदेडमध्ये शिवसैनिकांनी कृष्णा आष्टीकर यांचा निषेध केला. त्यानंतर पक्षातील वाद आणखी वाढला. अखेर पक्षविरोधी भूमिकेचा ठपका ठेवत कृष्णा पाटील आष्टीकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Published on: Jun 22, 2026 12:53 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us