Krushna Ashtikar | ती शिवसेनेचं ढेकूण, पक्षाचं रक्त पिते!; कृष्णा आष्टीकरांचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल

Krushna Ashtikar | ती शिवसेनेचं ढेकूण, पक्षाचं रक्त पिते!; कृष्णा आष्टीकरांचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल

| Updated on: Jun 22, 2026 | 12:38 PM

नांदेड-हिंगोली-परभणी विधान परिषद निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले असताना उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांनी विजयाबाबत आशावाद व्यक्त केला आहे. सकाळी सुरू झालेल्या मतमोजणीदरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपल्याला निकालाबाबत सकारात्मक अपेक्षा असल्याचे सांगितले.

या निवडणुकीत एकूण 452 मतदारांपैकी 451 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामुळे या मतदारसंघातील निकालाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या लढतीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे.

आज टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी पुन्हा सुषमा अंधारे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. काही लोकांनी माझ्याकडून काही अपेक्षा ठेवल्या, काही मागण्या केल्या होत्या, त्याही गोष्टींना मी सडेतोड उत्तर देणार आहे, असं त्यांनी सुनावलं. माझी भूमिका बरेच वेळा स्पष्ट केली आहे. पण एक कुठलीतरी अतिशय वाचाळ, तोंडाळ बाई, कालसुद्धा बोलली. राजुल पाटील, माझी भगिनी काल मातोश्रीवर गेली, उद्धव ठाकरेंना भेटून आली, तरीसुद्धा या विकृत बाईने, काल आमच्या दोघांवर शंका उपस्थित केली, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. आता बस करावं असं वाटायला लागलं आहे, असंही ते पुढे म्हणाले.

पुढे आष्टीकरांनी अंधारेंवर आणखी जोरदार टीका केली. त्या बाईला टीआरपी घ्यायची सवय लागली आहे, ती विकृत मानसिकतेची बाई आहे. माझे वडील जिवंत असताना तिने माल पिंडदान कर किंवा असं काही सांगितंल, मला त्या महिलेबद्दल फारसं काही बोलावसं वाटत नाहीये. मी आधी तिला चुकीची उपमा दिलेली सरडा म्हणून. खरंतर ती आता शिवसेनेचं ढेकूण झाली आहे ढेकूण.. म्हणजे ती आता असं रक्त पित्ये ना पक्षाचं , की ती आतून सर्वांना पोकळ करत्ये अशा शब्दांत कृष्णा आष्टीकर यांनी सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

Published on: Jun 22, 2026 12:38 PM
Follow Us