Chandrashekhar Bawankule | कुणबी प्रमाणपत्रावरून मोठा ट्विस्ट! बावनकुळेंच्या सूचनेनं एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही; अधिकाऱ्याचं पत्र आलं समोर
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून कुणबी प्रमाणपत्रांच्या चौकशीवर सुरू असलेल्या वादात आता महसूल विभागाकडून महत्त्वाचे स्पष्टीकरण समोर आले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाठवलेले पत्र हे केवळ कुणबी प्रमाणपत्रांच्या चौकशीसंदर्भात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. बावनकुळे यांच्या सूचनेनुसार कोणतेही कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेले नसल्याचेही महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागाच्या विशेष कार्याधिकाऱ्यांना यासंदर्भात पत्र दिल्याची माहिती समोर आली आहे. हे पत्र आता चर्चेत आले असून, मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांनंतर अधिकाऱ्यांचे हे पत्र समोर आले आहे.
कुणबी प्रमाणपत्रांच्या चौकशीबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्राचा संदर्भ देत विविध आरोप करण्यात आले होते. मात्र, या पत्राचा उद्देश केवळ प्रमाणपत्रांची चौकशी करणे हा असल्याचे अधिकाऱ्यांच्या पत्रातून स्पष्ट करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.
महत्त्वाचं म्हणजे, बावनकुळे यांच्या सूचनेनुसार कोणतेही प्रमाणपत्र थेट रद्द करण्यात आलेले नाही, अशी भूमिका महसूल विभागाकडून मांडण्यात आली आहे. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्रांच्या चौकशीवरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांना आता नवे वळण मिळाले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्रांच्या कारवाईवरून राज्य सरकार तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे पत्र समोर आल्याने या संपूर्ण प्रकरणात नेमकी वस्तुस्थिती काय आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.