डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन

डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन

| Updated on: Sep 26, 2026 | 11:16 AM

लालबागच्या राजाला निरोप देण्याचा क्षण भावूक करणारा ठरला. आधुनिक हायड्रोलिक तराफ्याने शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन पार पडले. संपूर्ण मुंबईकरांचे लक्ष या सोहळ्याकडे लागले होते. महाराष्ट्रातील ७५% भागांत जाहीर झालेल्या दुष्काळासाठी राजा चरणी प्रार्थना करण्यात आली, बाप्पाने विघ्ने दूर करावीत आणि पाऊस पाडावा अशी आर्त विनवणी भक्तांनी केली.

मुंबईच्या आराध्य दैवत लालबागच्या राजाला निरोप देण्याचा क्षण अत्यंत भावूक आणि चित्तथरारक होता. गेली दहा-बारा दिवस गणेशोत्सवाचा आनंद अनुभवल्यानंतर, राजाच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर भक्तगणांची अलोट गर्दी जमली होती. पुढच्या वर्षी लवकर या आणि गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात राजाला समुद्राच्या अथांग डोहात निरोप देण्यात आला. यावर्षी लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी ९३ व्या वर्षात मंडळाने खास हायड्रोलिक तराफ्याचा वापर केला, ज्यामुळे मूर्तीचे विसर्जन शिस्तबद्ध आणि शांतपणे पार पडले. कोणतेही गडबड किंवा गोंधळ न होता, शास्त्रोक्त पद्धतीने बाप्पाला निरोप देण्यात आला. सुरुवातीला राजाच्या चरणांना समुद्राच्या पाण्याचा स्पर्श झाला आणि हळूहळू मूर्ती पूर्णपणे पाण्यात विलीन झाली.

हा क्षण अनुभवताना प्रत्येक भक्ताचे डोळे पाणावले होते. या भावनिक प्रसंगी, महाराष्ट्रातील दुष्काळाचे सावट लक्षात घेऊन बाप्पा चरणी विशेष प्रार्थना करण्यात आली. राज्यातील ७५% भागांत, म्हणजेच २६५ तालुक्यांमध्ये जाहीर झालेल्या दुष्काळाचे संकट दूर व्हावे, शेतकऱ्यांची संकटातून सुटका व्हावी आणि पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम महाराष्ट्र व्हावा यासाठी भक्तांनी राजाकडे विघ्न दूर करण्याची विनवणी केली.

Published on: Sep 26, 2026 11:16 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us