मोठी बातमी! चादर धुतली अन् सापडलं Made in Pakistan! चिंचवडच्या यात्रेतील व्हायरल व्हिडिओने उडवली खळबळ

मोठी बातमी! चादर धुतली अन् सापडलं Made in Pakistan! चिंचवडच्या यात्रेतील व्हायरल व्हिडिओने उडवली खळबळ

| Updated on: Jun 05, 2026 | 5:55 PM

पिंपरी-चिंचवड शहरातील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरात संकष्टी चतुर्थीनिमित्त भरलेल्या यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ वस्तू विक्रीसाठी आल्याचं समोर आलंआहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरात संकष्टी चतुर्थीनिमित्त भरलेल्या यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ वस्तू विक्रीसाठी आल्याचं समोर आलंआहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला यात्रेतून खरेदी केलेली चादर दाखवत आहे. संबंधित चादर धुतल्यानंतर तिच्या एका कोपऱ्यात लपविण्यात आलेले लेबल आढळल्याचे महिलेने सांगितले. त्या लेबलवर ‘Made in Pakistan’ असा उल्लेख असल्याचा दावा तिने केला आहे.

या व्हिडिओनंतर स्थानिक बाजारपेठांमध्ये आणि यात्रांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येणाऱ्या वस्तूंच्या उगमाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रस्त्यावरील स्टॉल आणि यात्रांमधील वस्तूंची नियमित तपासणी केली जाते का, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.व्हिडिओमध्ये संबंधित महिलेने या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, देशात पाकिस्तानी वस्तूंवर विविध निर्बंध असताना अशा वस्तू स्थानिक बाजारपेठेत कशा पोहोचतात, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

दरम्यान, या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून अनेकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर काहींनी केवळ व्हायरल व्हिडिओच्या आधारे निष्कर्ष न काढता संबंधित लेबल आणि वस्तूची अधिकृत पडताळणी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणतीही वस्तू खरेदी करताना त्यावरील उत्पादनाची माहिती, उत्पादक कंपनीचे नाव आणि मूळ देश याची खातरजमा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडिओतील दाव्यांची अद्याप कोणत्याही अधिकृत यंत्रणेकडून पुष्टी झालेली नाही. संबंधित वस्तू नेमकी कुठून आली, ती अधिकृत मार्गाने आयात करण्यात आली होती का आणि विक्रेत्याची भूमिका काय आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

 

Published on: Jun 05, 2026 5:55 PM
Follow Us