मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX… आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल

मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX… आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल

| Updated on: Jul 11, 2026 | 2:58 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका वादग्रस्त प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माढा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या क्लिपमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

व्हायरल होत असलेल्या या कथित ऑडिओ क्लिपमध्ये सुरुवातीला खासदारांचे स्वीय सहाय्यक समोरच्या व्यक्तीशी संपर्क साधताना ऐकू येतात. त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील संबंधित व्यक्तीशी थेट संवाद साधत असल्याचे सांगितले जात आहे.

संभाषणादरम्यान संबंधित व्यक्तीला काही कागदपत्रांसह दुसऱ्या दिवशी भेटण्यास सांगण्यात आल्याचे क्लिपमध्ये ऐकू येते. मात्र, आपण सध्या सोलापूरमध्ये असल्याचे समोरच्या व्यक्तीने सांगितल्यानंतर संभाषणाचा सूर बदलल्याचे दिसून येत आहे. संभाषणात, “तू उद्या जर आला नाहीस, तर पंचायत समितीत येऊन तुझे हातपाय तोडेन, तुला काय सांगितलं XXX उद्या यायचं”

या कथित ऑडिओमध्ये शिवीगाळ तसेच धमकी दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, या ऑडिओ क्लिपची अधिकृत पडताळणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे आम्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

Published on: Jul 11, 2026 2:57 PM
Follow Us