महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत… विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द

महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत… विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द

| Updated on: Oct 07, 2026 | 12:34 PM

पुण्यातील आंबेगाव येथील महाज्योतीच्या परीक्षा केंद्रावर संगणक उपलब्ध नसल्याने विद्यार्थिनींना मोठ्या गोंधळाचा सामना करावा लागला. सकाळी ९ वाजताची परीक्षा असूनही अनेक विद्यार्थिनींना आत घेतले नाही, ज्यामुळे अखेर परीक्षा रद्द करण्यात आली. शिष्यवृत्तीसाठी आलेल्या गरजू विद्यार्थिनींना या प्रकाराने मनस्ताप सहन करावा लागला.

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील एका परीक्षा केंद्रावर महाज्योती (महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था) च्या परीक्षेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनींनी केंद्रावर पुरेसे संगणक उपलब्ध नसल्याचा दावा केला आहे. सकाळी ९ वाजता सुरू होणारी परीक्षा दुपारी ११ वाजेपर्यंतही सुरू होऊ शकली नाही, कारण अनेक विद्यार्थिनींना आतमध्ये प्रवेश मिळाला नाही. या घटनेमुळे विद्यार्थिनींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “आम्ही गरिबाच्या पोरी आहोत, शिष्यवृत्तीसाठी आलो आहोत,” अशी भावना एका विद्यार्थिनीने व्यक्त केली.

परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांनी सुरुवातीला प्रतिसाद दिला नाही, मात्र विद्यार्थ्यांच्या वाढत्या गोंधळानंतर अखेर या केंद्रावरील सर्व शिफ्ट रद्द करण्याची घोषणा करण्यात आली. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थिनींना मानसिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागले, कारण अनेक जणी दूरवरून प्रवास करून परीक्षा देण्यासाठी आल्या होत्या. महाज्योतीच्या या पेपरमध्ये घोळ झाल्याचा दावा रोहित पवार यांनीही केला आहे.

Published on: Oct 07, 2026 12:34 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us