Devendra Fadnavis | अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले?

Devendra Fadnavis | अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Mar 06, 2026 | 3:34 PM

मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात लाडकी बहिण योजनाबाबत मोठी घोषणा केली. त्यांनी स्पष्ट केले की, ही योजना यापुढेही सुरू राहणार असून योजनेकरिता आवश्यक भरीव तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री म्हणाले.

आज विधानसभेत महाराष्ट्र राज्याचा 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात लाडकी बहिण योजनाबाबत मोठी घोषणा केली. त्यांनी स्पष्ट केले की, ही योजना यापुढेही सुरू राहणार असून योजनेकरिता आवश्यक भरीव तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, “8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना शुभेच्छा. काळजी करू नका, तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट आम्ही पूर्ण करतोय. फक्त योजनेच्या विरोधासाठी कोर्टात जाऊ नका.” फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान हेही सांगितले की, सरकार लाडकी बहिण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी तत्पर राहणार आहे आणि योजनेच्या अंमलबजावणीत कोणतीही अडचण येणार नाही.

Published on: Mar 06, 2026 03:34 PM
Follow Us