Devendra Fadnavis On Ajit Pawar | अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं कारण

| Updated on: Mar 25, 2026 | 6:25 PM

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघातासंदर्भातील माहिती स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, VSR कंपनीच्या ऑपरेशन टीमने शेड्यूल्ड रोस्टरनुसार कॅप्टन राहुल ओबेरॉय आणि दिलीप सिंग यांना पायलट म्हणून २२:४२ वाजता नेमले होते. मात्र, ओबेरॉय यांनी त्यांच्या पॉटमध्ये तांत्रिक समस्या असल्यामुळे सकाळच्या फ्लाइटऐवजी संध्याकाळी लातूरला जाणाऱ्या फ्लाइटवर ड्युटी देण्याची सूचना केली.

यावर कंपनीच्या ऑपरेशन टीमने तातडीने कॅप्टन सुमित कपूर आणि पायलट शांभवी पाठक यांना या फ्लाइटसाठी नेमले. त्यानंतर नवीन शेड्यूल्ड रोस्टर रात्री २३:५४ वाजता संबंधित व्हाट्सअप ग्रुपवर पाठवण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, ऐनवेळी कोणत्याही पायलटची नेमणूक झालेली नव्हती आणि ही प्रक्रिया नियमानुसार पार पडली होती. फडणवीस यांच्या विधानातून या अपघाताच्या तांत्रिक व नियोजनासंबंधी परिस्थितीची माहिती उघड झाली आहे आणि अफवा व गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

Published on: Mar 25, 2026 06:25 PM
Follow Us