Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण… शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?

Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण… शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?

| Updated on: Sep 26, 2026 | 6:05 PM

महाराष्ट्रातील भीषण दुष्काळामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील भालगावातील चिमुकल्या मुलांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. ५० दिवसांच्या पावसाच्या खंडामुळे पिके वाळून गेली असून, दिवाळी कशी साजरी करायची, कपडे, वह्या-पुस्तके कशी घ्यायची, या चिंतेने त्यांना ग्रासले आहे. सरकारने मदत करण्याची मागणी केली जात आहे.

महाराष्ट्रात पावसाचा खंड पडल्यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भालगाव परिसरात गेल्या ५० दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

या मुलांनी आपल्या भावना मांडताना काही निशब्द करणारे सवाल उपस्थित केले. आमच्या पिकांचं नुकसान झालंय. एक महिन्यावर दिवाळी आली, आता आम्ही काय करायचं? कपडे नाहीत, चपला नाहीत, शाळेला वह्या-पुस्तकं नाहीत, अशी व्यथा त्यांनी मांडली. सोयाबीन, तूर आणि कापूस यांसारखी महत्त्वाची पिके पाण्याअभावी वाळून गेली आहेत.

घरात जेवण करतानाही पाऊस नाही, पाणी नाही, आता खायचं काय? प्यायचं काय? अशी चर्चा ऐकायला मिळते, असेही या मुलांनी सांगितले. दिवाळीत नवीन कपडे, फटाके आणि चपला कशा घ्यायच्या, या चिंतेने त्यांचे मन ग्रासले आहे. सरकारने दुष्काळ जाहीर केला असला, तरी या चिमुकल्यांचे अश्रू कधी थांबणार, हाच प्रश्न उपस्थित होत आहे.

Published on: Sep 26, 2026 6:05 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us