शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
राज्यातील सातबारा उताऱ्यावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांना आता अधिकृत रेकॉर्डवर आणण्याचा मोठा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे तब्बल 2 लाख 31 हजार शेतकऱ्यांना AgriStack मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे कर्जमाफीसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे शेतकऱ्यांसाठी अधिक सुलभ होणार आहे.

महसूल विभागाकडून सातबारा उताऱ्यावर नाव नसलेल्या पात्र शेतकऱ्यांची माहिती संकलित करून त्यांना रेकॉर्डवर आणण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यामुळे जमिनीशी संबंधित नोंदी अधिक अद्ययावत होण्यासोबतच शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रांची प्रक्रिया सुलभ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या प्रक्रियेसाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना 15 दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. संबंधित शेतकऱ्यांची माहिती, जमिनीच्या नोंदी आणि आवश्यक तपशील तपासून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
या निर्णयामुळे सातबारा उताऱ्यावर नाव नसल्यामुळे विविध शासकीय योजनांपासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कर्जमाफी, कृषीविषयक योजना आणि इतर सरकारी लाभ मिळवण्याचा मार्ग आता अधिक सोपा होणार असल्याने महसूल विभागाच्या या निर्णयाकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.