Devendra Fadnavis | युद्धामुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी उपाययोजना सुरू, फडणवीसांची माहिती!
मध्य पूर्वेत इराण आणि इतर देशांमध्ये युद्ध सुरु असल्यामुळे भारतीय नागरिक, विशेषतः महाराष्ट्रीयन लोक अडचणीत आले आहेत. इस्रायल, अमेरिका आणि आखाती देशांमध्ये इराणकडून मिसाइल हल्ले सुरु आहेत. सौदी अरेबिया, ओमान, दुबई, कुवैत यांसारख्या ठिकाणी अनेक भारतीय अडकले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत माहिती दिली.
मध्य पूर्वेत इराण आणि इतर देशांमध्ये युद्ध सुरु असल्यामुळे भारतीय नागरिक, विशेषतः महाराष्ट्रीयन लोक अडचणीत आले आहेत. इस्रायल, अमेरिका आणि आखाती देशांमध्ये इराणकडून मिसाइल हल्ले सुरु आहेत. सौदी अरेबिया, ओमान, दुबई, कुवैत यांसारख्या ठिकाणी अनेक भारतीय अडकले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, नागरिकांना मदत करण्यासाठी WhatsApp नंबर उपलब्ध करून दिला असून, लोक संपर्क साधत आहेत आणि त्यांच्या अडचणी दूर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एअर इंडियाच्या विमानांद्वारे लोकांना हळूहळू परत आणले जात आहे. काही एअर स्पेसेस बंद आहेत, काही सुरु आहेत, जिथून आणणे शक्य आहे तिथून नागरिक परत येत आहेत. कुवैतमध्ये काही नागरिक ट्रान्झिटमध्ये अडकले होते, त्यांच्या व्हिसा समस्या सोडवण्यात आल्या असून, त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. परदेशातील मराठी मंडळांच्या माध्यमातून लोकांना मदत केली जात आहे. व्हिडिओ कॉलद्वारेही संपर्क ठेवला जात आहे. हेल्पलाईनच्या माध्यमातून जेवण, सुरक्षा आणि इतर आवश्यक सुविधा पुरवल्या जात आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की, मोदी सरकारने मागील पाच-दहा वर्षांत संकटाच्या वेळेस भारतीयांना सुरक्षित परत आणले आहे आणि आता देखील नागरिकांना सुरक्षित परत आणण्यासाठी सर्व उपाययोजना केली जात आहेत.
