Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा दिलासादायक निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना आता 58 टक्के महागाई भत्ता (DA) देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

माध्यमांशी संवाद साधताना प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्त्यात वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना 53 टक्के महागाई भत्ता मिळत होता. आता त्यात वाढ करून तो 58 टक्के करण्यात आला आहे.
याशिवाय, एसटी कर्मचाऱ्यांची घरभाडे भत्त्यासंदर्भातील जवळपास 100 कोटी रुपयांची थकबाकीही देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
सरनाईक यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून हा सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सरकार संवेदनशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, महागाईच्या वाढत्या पार्श्वभूमीवर आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया कर्मचारी संघटनांकडून व्यक्त केली जात आहे.