Devendra Fadnavis | 6 तारखेपर्यंत धोका! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा इशारा; घराबाहेर पडण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहाच

Devendra Fadnavis | 6 तारखेपर्यंत धोका! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा इशारा; घराबाहेर पडण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहाच

| Updated on: Jul 04, 2026 | 3:09 PM

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर कायम असून, मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रशासन सतर्क झाले असून, मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसाचा फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीलाही बसला असून, मुंबई महानगर प्रदेशात (MMR) अनेक ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन करत येत्या 6 जुलैपर्यंत अपेक्षेपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी संघातर्फे आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यभर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाकडून दर तीन तासांनी हवामानाचा आढावा घेत अलर्ट जारी केला जात आहे. अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Published on: Jul 04, 2026 3:08 PM
Follow Us